पंढरपूर व मंगळवेढा शहरांचा देखणा कायापालट होण्यासाठी १० कोटी २ लाख निधी मंजूर - आ. समाधान आवताडे

0
पंढरपूर व मंगळवेढा शहरांचा देखणा कायापालट होण्यासाठी १० कोटी २ लाख निधी मंजूर - आ. समाधान आवताडे

(प्रतिनिधी): देवभूमी म्हणून आख्यायिका असणारी पंढरपूर आणि संतांची भूमी म्हणून संपूर्ण देशात मंगळवेढा अशी दोन्ही शहरांची प्रसिद्धी आहे. अनेक संतांच्या समर्पक आणि भक्ती सिद्धांत कार्यआस्तित्वाने पुनित झालेल्या पंढरपूर व मंगळवेढा शहराच्या पवित्र भुमीचा सर्वांगीण आणि देखणा कायापालट होण्यासाठी व शहरातील विकास कामे गतिमान होण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी व मंगळवेढा नगरपरिषदेस ५ कोटी २ लाख असा दोन्ही शहरांसाठी एकुणात्मक १० कोटी २ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सदर विकास निधी अंतर्गत
पंढरपूर शहरामध्ये मंजूर कामे पुढीलप्रमाणे -

१) प्रभाग क्रमांक १४ जिजाऊनगर अंतर्गत रस्ते करणे - ४० लाख २) प्रभाग क्रमांक १२ वाल्मिकीनगर अंतर्गत रस्ते करणे - ४० लाख ३) प्रभाग ४ लखुबाई मंदिर पाठीमागील परिसर रस्ता काँक्रिटीकरण करणे २५ लाख ४) वसंतनगर येथील अंतर्गत रस्ते करणे २५ लाख ५) राऊत मळा ते खंडू राऊत घर व खरे मळा ते शेख वकील रस्ता करणे ४० लाख ६) उमा कॉलेज ते हर्षद मेडिकल पर्यंत रस्ता करणे ४० लाख ७) अक्षद बेंगलोज मधील अंतर्गत रस्ते करणे २५ लाख ८) कुष्ठरोगी वसाहत गोपाळपूर नाका येथे लादीकरण करणे पांडुरंग वाडेकर घर राऊळ लादिकरण करणे १० लाख ९) जिजाऊ पुतळा व जिजाऊ उद्यान विकसित करणे १ कोटी १०) पद्मावती उद्यान विकसित करणे १ कोटी ११) शिवपार्वती नगर येथील सर्व्हे नंबर १०२ गणेश मंदिर शेजारी सभा मंडप बांधणे व वीर काशीद चौक येथे हायमास्ट बसविणे १३ लाख १२) हिंदू स्मशानभूमी मध्ये आसन व्यवस्था व सुधारणा विषयक कामे करणे २५ लाख १३) हजरत बाराइमाम सरकार इमाम बाड दर्गा सोयी - सुविधा व विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे २५ लाख.

मंगळवेढा शहरातील मंजूर असलेली विकासकामे पुढीलप्रमाणे -

१) सांगोला नाका ते बोराळे नाका रस्ता व गटार बांधणे २कोटी २५ लाख २) हजारे गल्ली धर्मशाळा ते प्रविण हजारे घर ४००मीटर रस्ता डांबरीकरण करणे २२ लाख ३) गजानन उन्हाळे घर ते केशव पडवळे घर रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधणे १० लाख ४) दिगंबर यादव घर ते सांगोला रोड पर्यंत रस्ता करणे २० लाख ५) सुरवसे ऑटो बोळ ते अजित शिंदे घर ते बागे मागील यादव सर घर ते मुख्य रस्ता काँक्रिटीकरण व गटार बांधणे तसेच पटवर्धन वकील ते बाळासाहेब जाधव घर काँक्रिटीकरण व गटार बांधणे १९ लाख ६) बबन चव्हाण घर ते सांगोला रिंग रोड सार्वजनिक शौचालया पर्यंत गटार बांधणे १६ लाख ७) चंद्रकांत पवार घर ते प्रकाश नलवडे शौचालयासमोर रस्ता करणे २० लाख ८) कल्याणप्रभू मंदिर ते नागणेवाडी दादा डोंगरे घरापर्यंत रस्ता व भिवाजी साळुंखे घरापासून तुकाराम सावंजी घरासमोरील गटार बांधणे २४ लाख ९) चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक डांबरीकरण रस्ता करणे १२ लाख १०) ढाणे घर ते सार्वजनिक शौचालय ते महादेव मंदिर पर्यंत रस्ता व गटार बांधणे १० लाख ११) टिकाचार्य मंदिर ते लोकमंगल सभागृह बोळ काँक्रिटीकरण करणे व समाधान हेंबाडे घर ते लक्ष्मण सावंजी घर काँक्रिटीकरण करणे १० लाख १२) अशोक लेंडवे घर ते बळीराजा बँक काँक्रिटीकरण करणे १० लाख १३) नगरपालिका शाळा नं ५ सुशोभिकरण व अद्यावतीकरण ५० लाख १४) शहरातील विविध विहिरी व आड गाळ काढणे व सुशोभिकरण तसेच कोंडुभैरी गल्लीतील नालसाहेब सभागृह बांधणे ३४ लाख असे एकूण ५ कोटी २ लाख रुपये निधी.

पंढरपूर व मंगळवेढा शहरांच्या कृतिशील पद्धतीने धोरणात्मक विकासासाठी आणि व्यापक कार्यशैलीने साकार होणाऱ्या प्रगतीसाठी आ. आवताडे नेहमीच सजग पद्धतीने आपली कार्यशैली राबवत असतात. कोणतीही राजकीय महत्वकांक्षा न ठेवता केवळ जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आ. आवताडे यांनी वेळोवेळी वरील विकास कामांसाठी शासन दरबारी आपला राबता ठेवून व पत्रव्यवहार करून हा भरीव निधी आपल्या पदरी पाडून घेतला आहे. राजकारणापलीकडे विकासाची दूरदृष्टी ठेवून आपले विधायक कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्याची छाप पाडणारे आ. आवताडे यांचे विकासाभिमुख नेतृत्व भरीव निधी मंजूरीमुळे आणखी व्यापक पद्धतीने जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघामध्ये निर्माण झाले आहे.

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने आ. समाधान आवताडे प्रयत्नशील असताना त्यांच्या अथक प्रयत्नांतून व दिलेल्या पत्रानुसार सदर निधी मंजूर झाला असताना आपली उंची बचत गटाच्या निधीपर्यंत मर्यादित असताना राज्याच्या व्यापक स्वरूपात निधीच्या बाबत आपण सुतोवाच करणे अयोग्य आहे - दिगंबर यादव       (मंगळवेढा)
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !