श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्य यांचा सन्मान
पत्रकार दिनाचे औचित्य साधून श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर शाखा पंढरपूर च्या वतीने पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला ह्या वेळी बँकेचे मॅनेजर श्री साळवी साहेब यांनी आपल्या मनोगतात पत्रकार हा समाज मनाचा आरसा असून समाजातील बऱ्या वाईट गोष्टीचा आढावा घेण्याचे काम पत्रकार करत असतात त्याच बरोबर सर्वसामान्यांच्या अन्याय अत्याचार अंधश्रद्धा ह्यावर सडेतोड आसूड ओढण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकार करत असतात म्हणूनच आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमच्या संस्थेच्या वतीने पत्रकार बांधवांचा छोटे खाणी सन्मान करून या कार्याची उतराई करीत आहोत तसेच ह्या वेळी बोलताना श्री साळवे म्हणाले श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगरच्या वतीने 131 शाखांमधून अशा प्रकारचे विविध कार्यक्रम साजरे केले जातात आजचा हा पत्रकार दिनाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात सर्व शाखेमध्ये साजरा केला जातो
या कार्यक्रमासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील शहर उपाध्यक्ष रफिक आतार शहर कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल प्रसिद्धी प्रमुख रामकृष्ण बिडकर शहर संपर्कप्रमुख नागेश काळे ज्येष्ठ पत्रकार अशोक डोळ सर तालुका कार्याध्यक्ष संतोष कांबळे कुमार कोरे व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते