स्वेरीमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न
चीनच्या वुहान मधील डॉ. नागेंद्र यादव यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘इनोव्हेटिव्ह अॅपरोच युजिंग ऑर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र नुकतेच संपन्न झाले.
'स्वेरीची 'इन्स्टिट्युशन्स इनोव्हेशन कौन्सिल' (आयआयसी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स (आय ईईई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात 'हुबेई पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी, चीनच्या वुहान मधील डॉ.नागेंद्र यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाबाबत, आयआयसी आणि इनोव्हेशन स्टार्टअप याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. अखिलेश पांडे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली तसेच प्रमुख पाहुणे डॉ. नरेंद्र यादव यांच्या चीन मधील हुबेई युनिव्हर्सिटी मधील कार्याबाबत माहिती दिली. दीपप्रज्वलन करून या मार्गदर्शनपर सत्राची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, डॉ.अखिलेश पांडे, आयआयसी समन्वयक प्रा.स्मिता गावडे, प्रा. सुजित इनामदार, प्रा. तेजस जोशी, प्रा. सीमा अटोळे व इतर प्राध्यापक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. यादव हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘प्रकल्पांची निर्मिती करताना विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता असावी त्यासाठी कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रोजेक्ट निवडण्यासाठी नविन प्रोग्रॅमिंग विषयांचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागामध्ये प्रोजेक्टची निवड व निर्मिती कशी करावी? कृषिविषयक, आरोग्यविषयक, शैक्षणिक यासारख्या विविध विषयांवरील प्रकल्पांमध्ये नाविन्यता कशी आणता येईल.’ याबाबत मार्गदर्शन करून संशोधनासाठी मशिन लर्नींग आणि डीप लर्नींग यांचा उपयोग कसा करावा? या विषयावर देखील माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या क्षेत्रातील ‘संधी आणि आव्हाने’ याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. भविष्यातील विकासासाठी विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स' चा दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून स्वेरीच्या आदित्य विष्णूमुर्ती होऴ्ळा, निखील नागनाथ गायकवाड व शिवराज तानाजी मगर या तीन विद्यार्थ्यांची ‘इन्क्यूबेशन सेंटर’ मध्ये निवड झाल्याबद्धल त्यांचा गौरव करून पारितोषक वितरण करण्यात आले. या मार्गदर्शन सत्रामध्ये स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील १५० विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी तायवाडे व धनश्री व्यवहारे यांनी केले तर मुकुंद तळेकर व धनराज इंगळे यांनी आभार मानले.