पंढरपूर येथे रंगणार पंढरपूर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
दि १२फेब्रुवारी रोजी केबीपी कॉलेज येथे होणार भव्य आयोजन.
पंढरपूर(प्रतिनिधी) महाविद्यालयीन जीवन म्हणजे जीवनातील सोनेरी दिवस , ना कोणती चिंता, ना काळजी ,रम्य पहाटेला एखादे सुंदर स्वप्न पडावे . असे हे दिवस कधी उडून जातात हे कळतही नाही. आणि उरतात केवळ आठवणी. पण याच आठवणींवर आपण जगत असतो,आणि समजा हे बहारदार दिवस पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर ? काय बहार येईल ना, आणि हाच विचार करून पंढरपूर येथील के बी पी कॉलेज अर्थातच जुन्या पंढरपूर कॉलेज पंढरपूर च्या माजी विद्यार्थी,विद्यार्थिनींनी ' गेट टुगेदर,म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे.
रविवार दि१२फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील के बी पी कॉलेज अर्थातच जुन्या पंढरपूर कॉलेज पंढरपूर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आठवणीतील सुवर्णक्षण , या नावाने हा सुंदर सोहळा पुन्हा तेच बहारदार,रमणीय आठवणींचा काळ(नॉस्टॅल्जिया)घेऊन येणार आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री प्रशांत परिचारक, सांगोल्याचे आमदार व पंढरपूर कॉलेज चे माजी विद्यार्थी श्री शहाजी बापू पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या संदर्भात कॉलेजचे प्राचार्य डॉ खिलारे यांच्या समवेत सुवर्णक्षण च्या आयोजक मंडळींची बैठक संपन्न झाली आहे.या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात१९६० ते १९९५ पर्यंतच्या माजी विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
२०१६ साली असाच स्नेह मेळावा संपन्न झाला होता. डॉ प्राजक्ता बेणारे, श्री नागेश भोसले, श्री मंगेश देशपांडे, श्री शाम सावजी, श्री श्रीपाद(मनू)दाते, विजय परदेशी, राजेंद्र केंगार, दिलीप सुरवसे, पत्रकार रामेश्वर कोरे,गायक मुन्ना शेख, सौ पद्मा दवे सावजी,सौ माधुरी वैद्य,सौ मंजुषा कुलकर्णी,सौ फैमिदा विजापूरे मॅडम, डॉ चांगदेव कांबळे, श्री जेधेसर, श्री काळेल सर आदी मान्यवर आयोजक समितीत कार्यारत असून वेगाने तयारी सुरू आहे.नुकतेच सांगोल्याचे आमदार श्री शहाजी बापू पाटील यांनी आमंत्रण स्वीकारले आहे.