बार्शी तालुकयातील पांगरी गावात फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार ४ गंभीर जखमी

0
बार्शी तालुकयातील पांगरी गावात फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी 

 जिल्हा प्रतिनिधी :  प्रकाश इंगोले

बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी. प्रशासन तत्काळ रवाना
बार्शी  तालक्यातील पांगरी या गावात रविवार दी.१ जानेवारी दुपारी  चारच्या सुमारास भीषण घटना घडली असून फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्दैवी घटना घडली आहे. यात तीन जण जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास १० कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार ६ ते ७कर्मचारी जखमी झाले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !