पंढरपूर तालुक्यातील मौजे रांझणी ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरपंच पदी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या गटाच्या मा. सौ. रेश्माताई बंडू शिंदे - पाटील यांची वर्णी लागली लागली आहे.

0
पंढरपूर तालुक्यातील मौजे रांझणी ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सरपंच पदी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे *कार्यसम्राट आमदार मा. समाधानदादा आवताडे* यांच्या गटाच्या मा. *सौ. रेश्माताई बंडू शिंदे - पाटील* यांची वर्णी लागली लागली आहे.
सदर निवडीनंतर रांझणी नगरीच्या प्रथम नागरिक *मा. सौ. रेश्माताई शिंदे - पाटील* यांचा *आमदार मा. दादासाहेब* यांच्या हस्ते आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सपतीक फेटा बांधून अभिनंदन पर सत्कार करण्यात आला. श्री शंभू महादेव यांच्या पदस्पर्शाने आणि अस्तित्वाने पुनित व पावन झालेल्या रांझणी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि धोरणात्मक विकासासाठी कोणताही राजकीय गट - तट यांचा आकस न ठेवता जनतेच्या सर्वसमावेशक मूलभूत आणि पायाभूत जीवन समृद्धीसाठी आपल्या पदाचा व अधिकाराचा वापर करा असा कार्यमंत्र *आमदार मा. दादासाहेब* यांनी दिला.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सेवाभावी नेतृत्व कौशल्याने विकासपुरुष असा लौकिक असणाऱ्या *आमदार मा. दादासाहेब* यांच्या विचारांची पगडी उराशी बाळगून कोणत्याही राजकीय आमिषाला व अफवांना बळी न पडता आम्ही *आमदार महोदय* यांच्याच नेतृत्वाखाली आमची राजकीय वाटचाल सक्षमपणे पुढे चालू ठेवू असा परखड विश्वास मिस्टर सरपंच तथा युवक नेते मा. राजाराम उर्फ बंडू शिंदे पाटील यांनी बोलून दाखविला.

यावेळी श्री.राजाराम उर्फ (बंडू) पाटील,श्री.दादा घायाळ, मा.सरपंच श्री.संभाजी कांबळे,श्री.योगेश चौगुले,श्री.विष्णू घायाळ,श्री.नितीन घोडके,श्री.शंकर शिंदे,श्री. आण्णासो आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !