अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवेढा येथे शौर्य दिन साजरा

0
अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवेढा येथे शौर्य दिन साजरा

प्रतिनिधी सोलापूर :  प्रकाश इंगोले

मंगळवेढा-: अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे 1 जानेवारी 2023 हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मंगळवेढा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे म्हणाले की सन 1818 ला पेशवे व महार सैनिकांच्या मध्ये जी लढाई झाली ती महार सैनिकांच्या आत्मसन्मानाची व अस्तित्वाची लढाई होती. मानवी हक्कावर गदा आणणाऱ्यांच्या  विरोधातील ते युद्ध होते. त्या युद्धामध्ये 500  शूर महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव केला. महार सैनिकांच्या या पराक्रमाचे कायम स्मरण राहावे म्हणून इंग्रजांनी पुणे नगर रोड वरती महारांच्या विजयाच प्रतीक असलेला स्तंभ उभारला त्याला च भीमाकोरेगाव चा विजयस्तंभ म्हणून ओळखले जाते. 
           आपल्या या पूर्वजांच्या पराक्रमाला उजाळा देण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर दर वर्षी 1 जानेवारी ला त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जात असत व त्या ठिकाणी बसून मनन चिंतन करत असत.
             यावेळी पक्षाच्या जिल्हा राज्य महिला उपाध्यक्ष पद्मिनी शेवडे, सेवा निवृत्त शिक्षक सिद्धेश्वर ढावरे सर ,शहर अध्यक्ष राहुल लोखंडे, हिवरगावचे माजी सरपंच रामचंद्र खांडेकर, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी एम.व्ही. कांबळे, प्रांत कार्यालयाचे ओंकार तटपटे (लल्लू)  ,नवनाथ मेटकरी, प्रा. रवींद्र आठवले, बाळू ढावरे ,सुग्रीव शिवशरण यांच्या सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.       
         शेवटी सिद्धेश्वर ढावरे (सर) यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !