शिवाजीराव गायकवाड कसा बनला रजनीकांत ; जेजुरीत जन्माला आलेल्या मराठममोळ्या कलाकाराची गोष्ट

0

शिवाजीराव गायकवाड कसा बनला रजनीकांत ; जेजुरीत जन्माला आलेल्या मराठममोळ्या कलाकाराची गोष्ट

आपल्याकडे सुरुवातीच्या काळात सिनेमांचा हिरो हा फक्त गोरागोमटा चेहऱ्याचा असायचा, यालाच छेद देत हिरो रंगाने काळा आणि सोवळा सुध्दा असू शकतो हे सिध्द करणारा, असा दक्षिणात्य सिनेमांमधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारा, भारतातच नव्हे तर जगात आपल्या नावाची मोहर उमटवणारा दक्षिणात्य 'सुपरस्टार रजनीकांत'  यांचा आज ७२ वा जन्मदिवस!

१२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरू इथं हेंद्र पाटील या मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळगाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील कडेपठार माऊडी हे आहे. रजनीकांत यांच खरं नाव शिवाजीराव गायकवाड असून, वडिलांच नाव रामोजीराव आणि आईच नाव जिजाबाई गायकवाड असं आहे.


सुरुवातीच्या काळात म्हणजेच रजनीकांत तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करण्याच्या अगोदर बस कंडक्टर म्हणून काम काम करायचे. याचा संदर्भ २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी-द बॉस' या सिनेमात सापडतो. एक प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये मामा आणि भाचे बसमधून प्रवास करत असतात. काही अंतरावर ते दोघं बसमधून खाली उतरत असताना, शिवाजी हा बस थांबवण्यासाठी घंटा वाजवतो. आणि दोघेही बसमधून खाली उतरतात. त्यावेळी मामा: "शिवाजी तुम पहले बस कंडक्टर थे क्या?" या संवादांमधून रजनीकांत यांच्या जीवनाशी निगडित काहीशी पार्श्वभूमी चित्रित केली गेली आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बालाचंद्र यांनी १९७५ मध्ये 'अपूर्व रांगगल' या सिनेमात रजनीकांत यांना भूमिका दिली. या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. जवळपास दहा वर्ष तमिळ इंडस्ट्री गाजवल्यानंतर १९८३ साली अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'अंधा कानून' या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक तमिळ आणि हिंदी सिनेमे केले. रजनीकांतची अभिनयशैली एका वेगळ्या प्रकारची असायची. प्रत्येक सिनेमांमधून आपल्याला पाहायला मिळते. खासकरून सिग्रेट हातातून भिरकावून तोंडात ठेवण, शर्टाची कॉलर हातात घेऊन उडवणं, एक वेगळ्या प्रकारची वेशभूषा/केशभूषा, चालण्याची वेगळी लकब, संवादाचं अचूक टाइमिंग, आवाजातील चढ-उतार या सर्व बाबी फक्त आणि फक्त रजनीकांत यांची 'स्टाइल' या नावान संबोधल्या गेल्या आणि त्या आजही जशाच्या तशा आहेत. असं त्यावेळचे प्रेक्षक म्हणायचे आणि आत्ताच्या घडीचे प्रेक्षकही तितक्याच तन्मयतेनं म्हणतात.

सत्तरी पार होऊन त्यांचा अभिनय आजही तरुणच वाटतो. दरम्यानच्या काळात त्यांचे 'कबाली', 'काला', 'पेट्टा या सिनेमातला अभिनय आजच्या काळातल्या विशीतल्या मुलांनाही प्रचंड आवडतो. कबाली सिनेमाबद्दलच्या अनेक बातम्या सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर वर्तमानपत्रातून छापून येत होत्या. तिथल्या सरकारनं कबाली हा सिनेमा सर्वांना पाहता यावा यासाठी तीन दिवसीय सुट्टी जाहीर केली होती. इतकं वलय रजनीकांत या व्यक्तीने तिथल्या प्रेक्षकांच्या मनात प्रस्तापित केलंय. 

रजनीकांत यांना देव मानून दह्या, दुधानं त्यांच्या प्रत्येक सिनेमांच्या पोस्टरवर अभिषेक करणारे त्यांचे चाहते आजही आहेत.

सिनेमातले काही चेहरे, हिरो असो हीरोइन असो सपोर्टिंग कॅरेक्टर असो हे फक्त ठराविकच प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि आवडतात. प्रत्येक प्रेक्षकाला असा एकतरी आपला वाटणारा कलाकार असतो. पण रजनीकांत यांच्या बाबतीत तसं दिसणार नाही. त्यांचा चेहरा, अभिनयस्टाइल सर्वांनाचं आवडते. त्यांनी आतापर्यंत जितक्या काही भूमिका केल्या, त्या सर्व भूमिका अजरामर झाल्या. २००० साली केंद्रसरकार तर्फे पद्मभूषण तसेच २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !