Tik tok star Santosh Munde dies ;
संतोष मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू ;
संतोष मुंडे या ग्रामीण भागातील हरहुन्नरी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी देखील शोक व्यक्त केला असून महावितरणच्या कारभारावरुन या कंपनीलाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळं आपला जीव धोक्यात घालून स्वतः बरीच कामं करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक आहे हे समोर आलं पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे