'बाळूमामा' फेम सुमीत पुसावळे लवकरच अडकणार लग्नबांधनात लग्नाआधी च्या विधींना सुरवात
सध्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटी विवाहबंधानात अडकत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीहीचा दापोलीत विवाह संपन्न झाला.
अभिनेता सुमीत पुसावळे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे आणि त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सेलिब्रिटी कट्टा या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
सुमीत मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. मागील महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्याचे फोटो शेअर करत ही बातमी त्याने चाहत्यांना दिली होती.
सुमीत पुसावळेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत आहे.