युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त केसकरवाडी येथे टिफिन बॉक्स व खाऊ वाटप
प्रतिनिधी :आज केसकरवाडी येथे पंढरपूर तालुक्याचे युवक नेते मा.प्रणव (मालक) परिचारक यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा.केसकरवाडी येथे टिफिन बॉक्स व खाऊ वाटप युरोपियन शुगर चे MD रोहन (मालक) परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी भाजपा नेते अक्षय वाडकर, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष हर्षल कदम, विकास सावंत, देवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहूल शिंदे, यांच्या सह गावातील जेष्ठ नागरिक युवक सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन केसकरवाडी चे सरपंच प्रकाश केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सदाशिव केसकर यांनी केले होते.