पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने नूतन पंढरपूर विभाग प्रमुख श्री विरेंद्र सिंह उत्पात यांचा सत्कार.
पंढरपूर येथे पंढरपूर विभाग पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने नूतन पंढरपूर विभाग प्रमुख या पदावर न्यूज 18 लोकमत या वाहिनीचे प्रतिनिधी श्री विरेंद्र सिंह उत्पात यांची पंढरपूर विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
पंढरपूर विभागात सांगोला,मंगळवेढा,माळशिरस,व पंढरपूर या चार तालुक्यांचा समावेश असणार आहे.यावेळी राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य अध्यक्ष श्री यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे, पंढरपूर शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,उपाध्यक्ष रफीक आतार तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रवी शेवडे राज्य सचिव आशिष सुंना, सचिव बाहुबली जैन,खजिनदार चैतन्य उत्पात, सहसचिव, विश्वास पाटील, प्रसिधीप्रमुख रामकृष्ण बिडकर,
अमोल गुरव, शहर संपर्क प्रमुख नागेश काळे, संतोष कांबळे,कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, नामदेव लकडे, मिलिंद गायकवाड, माऊली डांगे, सोलापूर येथील नागनाथ गणपा,बाबा काशीद आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी राज्य अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकाराच्या समस्या, खंडणीचे खोटे गुन्हे, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांना, त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत मिळणे बाबत यावर राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. पत्रकार विरेंद्र सिंह उत्पात यांनी विविध प्रश्न, पत्रकारांच्या समस्या याबाबत मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले. नूतन पंढरपूर विभाग प्रमुख उत्पात यांचा यावेळी पुष्पहार,शाल परिधान करून सत्कार करण्यात आला.