महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या चेअरमन पदी संजय नवले यांची निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील हँडबाॅलच्या प्रचार आणि विकासासाठी काम करीत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील हँडबाॅल असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक नुकतीच मध्यप्रदेश मध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या चेअरमन पदी सिंहगड इन्स्टिट्युटचे सचिव संजय नवले यांची यांची निवड करण्यात आली आहे.
हँडबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील हँडबाॅलसाठी प्रशासकीय आणि नियंत्रण संस्था आहे. हि संस्था हँडबाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे संलग्न सदस्य असलेले रवींद्र गायकवाड अध्यक्ष आहेत. यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या समितीची निवड करण्यात आली. यामध्ये चेअरमन म्हणून सिंहगड इन्स्टिट्युटचे सचिव संजय नवले, संयोजक रणधीर सिंग, सदस्य विजय सोनवणे, एचएफआय कडून राजेश कानूनगो, योगेश मेहता आदींची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या निवडणूका वेळेत पार न पाडल्यामुळे यापूर्वीची समिती बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या चेअरमन पदी सिंहगड इन्स्टिट्युटचे सचिव संजय नवले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या सह सिंहगड इन्स्टिट्युट मधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.