" तुझी अंडी पिल्ली माहिती आहेत" म्हणत मल्हार पाटील यांनी ओमराजे यांना फटकारले
उस्मानाबाद : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात काल 3 डिसेंबर चांगलीच जुंपली होती. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल पीकविमा आढावा बैठक आयोजित केली होती.
त्यांच्या या वादात आता पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांनीही ओमराजें फटकारलं आहे. ''औकातीत रहा आम्ही तुझे राहते घर शेती पुण्यातील फ्लॅट हे माझ्या आजोबांनी दान केले आहे. तू मुंबई पोरी घेऊन फिरतोस. पाटील कुटुंबाला तुझी अंडी पिले माहीत आहेत. त्यामुळे तू औकातीत राहा, आम्ही संस्कारी लोक आहोत म्हणूनच शांत राहिलो इथून पुढे तू जर काय करशील तर तुझी गाठ मल्हार पाटलांशी असेल, असा दम मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिला आहे. '' एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ओमराजे यांना सुनावलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याधिकारी कार्यालयात आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसान या संदर्भात बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोरच पीकविम्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. बैठक सुरु असताना, राणा पाटील यांनी पीकविमा देताना कंपन्यांकडून भेदभाव केला जातो. प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. पण त्याचवेळी, प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का करताय? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी केला.
याचवेळी ओम राजेनिंबाळकर यांना उत्तर देताना राणा पाटील यांनी त्यांचा 'बाळा' असा उल्लेख केला.पण संतापलेल्या ओमराजे यांनी 'तू तुझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहेत,' असं म्हणत राणा पाटील यांच्यावर आगपाखड केली. इतकेच नव्हे तर, 374 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत असताना विमा कंपनीचे हे लोकच एजंटगिरी करतात. सर्वोच्च न्यायालयाने पीकविमा देण्याचे आदेश दिल्यानंतरही ते दिले जात नसतील तर शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, अशी मागणीही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केली.