Mumbai measles disease ; मुंबईत गोवर रुग्णांची झपाट्याने वाढ; अशी घ्या काळजी ;
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत गोवरने डोकेवर काढले आहे. गोवर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत गोवरचे 740 संशयित रुग्ण आहेत. यातील 50 रुग्ण एकट्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गोवर हा आजार संसर्गजन्य असल्याने बालकांना याचा अधिक धोका आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे.
दरम्यान, गोवर आजाराचा धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने यासाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचे लसीकरण सुरु आहे. नऊ महिन्यांचे बालक व 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 50 बालकं उपचार घेत असून, एक मूल व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे.
लहान बालकांचा आहार चांगला ठेवा, स्वच्छता ठेवा, लक्षणे आढळल्यास रक्त आणि लघवीची स्वॅबद्वारे चाचणी करा. चाचण्यांच्या आधारे गोवर किंवा रुबेलाचे निदान करण्यास मदत होते. बालकांचे लसीकरण झालेले नसल्यास लसीकरण करुन घ्या, तुमच्या परिसरात कोणी गोवर रुग्ण बालक असल्यास त्यापासून लांब राहा, सर्दी, खोकल व ताप आल्यास त्वरित डॉक्टराच्या सल्लाने औषधे घ्या