जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर ;
एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिदा रशिद असे या तक्रारदार महिलेचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जवावर आज सुनावणी पार पडली.
यावेळी कोर्टाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने युक्तीवाद केला. चव्हाण यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडीओदेखील कोर्टात सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिलेला नसल्याचं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं.
संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहीण मानतात. मग बहीण मानणाऱ्या महिलेचा ते विनयभंग कसा करतील? असा सवाल वकिलांना कोर्टात उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला होता.
यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली होती