शेवग्याच्या पानाची पावडर तयार करण्याची घरगुती पद्धत
- शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून सावलीत वाळवावीत. पाने सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.
- शेवग्याची पाने वाळवताना जाळीदार कापडाने झाकावीत. पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.
- पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. तयार पावडर हवाबंद डब्यात साठवावी
फायदे काय आहेत?
शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.
१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते.
गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.
शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते.
शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते.
शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.
या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते.
शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.