ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे काळाच्या पडद्याआड ;

0
ज्येष्ठ अभिनेते सुनिल शेंडे काळाच्या पडद्याआड ; 

निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर' यांसारख्या चित्रपटांतून घराघरांमध्ये पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सुनील शेंडे  यांचे निधन झाले आहे.

मुंबई येथील विले पार्ले परिसरात राहत्या घरी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.


अभिनेते सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही अनेक भूमिका साकारल्या आहोत्या. प्रामुख्याने 'वास्तव', 'सरफरोश' यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 

मराठीमध्ये त्यांनी निवडुंग (1989), मधुचंद्राची रात्र (1989), जसा बाप तशी पोर (1991), ईश्वर (1989), नरसिम्हा (1991) या चित्रपटांतील त्यांच्या प्रेक्षकांना विशेष आवडल्या. याशिवा त्यांनी विविध चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणूनही काम केले. पाठिमागील काही काळापासून ते अभिनय आणि सिनेइंडस्ट्रपासून काहीसे दूर होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !