रामदेव बाबांनी हे वादग्रस्त विधान केले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाण्यात एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हा कार्यक्रम महिलांसांठी आयोजित करण्यात आला होता. महिलांसाठी योगाचंही प्रशिक्षणाचं हा कार्यक्रम होता. कार्यक्रमात सकाळी योग शिबिर झाले, कार्यक्रमासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र त्वरित महिलांसाठी महासंमेलन सुरू झाले. यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी वक्तव्य करत केले की,
महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर त्या काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले. यावेळी मंचावर त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.