पंढरपूर रोटरी क्लब कडून "थंडीपासून संरक्षण" या विषयावर मार्गदर्शन

0
पंढरपूर रोटरी क्लब कडून "थंडीपासून संरक्षण" या विषयावर मार्गदर्शन

पंढरपूर: प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढते. सद्या जरी थंडी कमी असली तरी थंडीची तीव्र वाढल्यावर कोणती काळजी घ्यावी? याबद्दल पंढरपूर रोटरी क्लब कडून "थंडीपासून संरक्षण" याविषयावर रो. डाॅ. संगीत पाटील यांनी बालकाश्रम, वृद्धाश्रमा व पालवी संस्थेत मार्गदर्शन केले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
 यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना डाॅ. संगीता पाटील म्हणाल्या, थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोक गरम कपडे घालून झोपण्यास प्राधान्य देत असतात. यातून थंडीपासून सुटका तर होते. परंतु, यातून आरोग्याला अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वेटर वा तत्सम कपडे घालून झोपल्याने आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी थंडी मध्ये व्यायाम करणे देखील तितकंच महत्वाचे आहे. नियमित व्यायाम व सकस आहार घेतल्यास थंडीपासून संरक्षण मिळते. याशिवाय काहींना स्वेटरची एँलर्जीची समस्या, मधुमेह, शरीरावरील ओरखडे निर्माण होण्यापासून बचाव अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी थंडीपासून संरक्षण मिळवायचे असेल तर लोकरी पासुन बनवलेले कपडे, मफलर किंवा स्कार्फ खुप प्रभावी करू करतो असे मत डाॅ. संगीता पाटील यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
   या कार्यक्रमास पंढरपूर रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, सचिव सचिन भिंगे, रो. किशोर निकते, रो. डाॅ.  संगीता पाटील, रो. सोमेश गानमोठे, रो. आनंद गोसावी आदीसह रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचे सदस्य उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !