पंढरपूर सिंहगड मध्ये "आडियाथाॅन" कार्यक्रम संपन्न
पंढरपूर: नागेश काळे
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी "आडियाथाॅन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डाॅ. अतुल सागळे, अमोल निटवे, प्रा. अतिष जाधव, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. मदणे, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. कुंभार, प्रा. कलागते, प्रा. पुरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागाचे प्रमुख प्रा. अनिल निकम, रोटरी क्लब पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने सिंहगड महाविद्यालयात संविधान वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळेस उपस्थित विद्यार्थ्यांना अमोल निवटे यांनी स्टार्टअप बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. याशिवाय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण वाढण्यासाठी आवश्यक माहिती दिली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदिप कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मानले.