महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचे वक्तव्य केले आहे. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत. 'महाराष्ट्रातील कन्नड भाषिक भाग कर्नाटकचा आहे', अशी आमची मागणी आहे, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.
पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचे असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी सह जे आमचे गाव आहेत ते आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.