रोटरी क्लब कडून ध्येय क्रांती ग्रंथालयास कपाट भेट
लक्ष्मी दहिवडी:
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून रो. किशोरजी सोमाणी यांच्या सौजन्याने लक्ष्मी दहिवडी (ता.मंगळवेढा) येथील महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित, ध्येय क्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय कार्यालयात कार्यालयीन कागदपत्र फाइल्स ठेवणेसाठी कपाट भेट देण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
महात्मा फुले युवा मंच लक्ष्मी दहिवडी (ता.मंगळवेढा) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे सह महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष प्रा. बाळासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल टाकळे, सचिव दिपक उर्फ बाबा वाघमारे यांच्या सुचनेने पंढरपूर रोटरी क्लबचे कार्यतत्पर विद्यमान अध्यक्ष रो. डॉ. कैलाश करांडे, सचिव रो. सचिन भिंगे यांना ग्रंथालयाची कागदपत्र ठेवणेसाठी कपाटा ची गरज लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी ध्येय क्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय यांना कपाट भेट दिले आहे.
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून, महात्मा फुले युवा मंच गेली २५ वर्ष सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम घेऊन वाटचाल करत आहे. लक्ष्मी दहिवडी व पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी ध्येय क्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरू केले आहे. या ग्रंथालयातून अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेले. तरूण-तरूणी पुस्तके घेऊन निश्चित एक कर्तबगार अधिकारी बनुन देशाचा सुसंस्कृत व सृजनशील नागरिक बनुन देशाची सेवा करेल. रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून ध्येय क्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालयास कपाट देऊन नविन उभारी दिल्याबद्दल महात्मा फुले युवा मंच लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब पंढरपूर चे सर्व सदस्य, बापू माने सह अनेकांनी परिश्रम घेतले.