अत्याधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या सहकारी बॅंकांमध्ये दि पंढरपूर मर्चंट्स को ऑफ. बँक लि पंढरपूर चा समावेश
बँकेने मोबाईल ॲप व क्यूआर कोडची सुविधा सुरु केली आहे सदर कार्यप्रणालीचे उद्घाटन बॅंकेचे अध्यक्ष या.नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
पंढरपूर प्रतिनिधी-नागेश काळे(7020366761)
येथील दि पंढरपूर मर्चंट्स को ऑफ बँक लि पंढरपूर बँकेने आपल्या कार्यप्रणालीमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून बँकेने मोबाईल ॲप व क्यूआर कोडची सुविधा सुरु केली आहे सदर कार्यप्रणालीचे उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक १९/११ / २०२२ रोजी बँकेचे मा. श्री वि.औ. तथा बाबुराव म्हमाणे सभागृहात कार्यक्रम पार पडला सदर उद्घाटन बँकेचे अध्यक्ष - श्री. नागेश अण्णासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री. अरुण भगवान शिंदे, संचालक श्री. युवराज विलासराव पाटील, श्री. भारत शिवदास भिंगे, श्री. आनंद मुनि आप्पा शेटे, श्री. राजेंद्र बसवेश्वर डोंबे, श्री. शितल विद्याधर तंबोली, श्री. ॲड. भगवान वसंतराव भादुले, श्री. सोमनाथ सिद्धेश्वर आंबरे, श्री. राहुल अशोक म्हमाने, श्री. किरण शंकर घाडगे, श्री. राजेश वसंतराव धोकटे, श्री. आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपुरकर व महिला संचालिका- सौ. मंजुश्री सुधीर भोसले, सौ. लक्ष्मी वसंतराव परचंडराव तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेन्ट सदस्य - प्रा श्री. सोमनाथ बाळासाहेब ठिगळे, प्रा श्री. राजेंद्र सदाशिव मोरे, सी ए श्री. हरी उद्धव लबडे, सी ए श्री. पियुष राजेंद्र फडे, व्यवस्थापक - श्री. अतुल महादेव म्हमाणे व श्री. सुनील गंगाधर मोहिते उपव्यवस्थापक - श्री. रमेश नारायण कुलकर्णी यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष श्री. नागेश भोसले म्हणाले, बँकेने ग्राहकांच्या विश्वासाहर्ता जपत मोबाईल ॲप व क्यूआर कोडच्या माध्यमातून कोठूनही रक्कम मागवता येणार असून याचा फायदा खातेदारांना होणार आहे तसेच ॲपच्या माध्यमातून खातेवरील शिल्लक , चेकबुक सुविधा इ. सुविधांचा लाभ घेता येणार आहे. लवकरच या ॲपद्वारे रक्कम पाठविणे, मोबाईल रीचार्ज, बिल भरणा या पण सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असे सांगितले. यापूर्वी देखील बँकेने सीटीएस चेकबुक सुविधा याद्वारे ग्राहकांना सेवा पुरवली जात असून आता मोबाईल ॲप माध्यमातून बँकेने एक पाऊल पुढे टाकलेले आहे, लवकरच मायक्रो एटीएम सुविधा सुरु करणार आहोत तरी दि पंढरपूर मर्चंट्स को.ऑफ बँक लि पंढरपूर बँकेच्या सर्व खातेदारांनी सुविधांचा लाभ घ्यावा या सुविधामुळे पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या सहकारी बँकांमध्ये दि पंढरपूर मर्चंट्स को ऑफ. बँक लि पंढरपूर बँकेचा समावेश झाला आहे त्या प्रसंगी श्री सुधीर भोसले, श्री. वसंतराव परचंडराव, श्री. संतोष शिंदे श्री सचिन म्हमाणे, श्री चंद्रशेखर कुलकर्णी, श्री. रमेश घाळसासी, श्री. राजकुमार गांधी, श्री.महावीर फंडे श्री. मिलिंद गुरसाळकर आदी बँकेचे खातेदार बहुसंखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अंती बँकेचे संचालक श्री.ॲड. भगवान वसंतराव भादुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.