चंद्रभागा नदी काठच्या १२० ग्रामपंचायतीचे आराखडा तयार करण्याचे काम सुरू
चंद्रभागा नंदीचे पावित्र्य राखा. जनावरे धुवू नका. कपडे भांडी, वाहने धुवू नका. जुनी कपडे प्लास्टीक, कचरा टाकू नका. नदी साठी उघड्यावर शौच विघी करू नका ---- सिईओ दिलीप स्वामी
मोहोळ - प्रतिनिधी
नमामी चंद्रभागा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत नदीकाठच्या १२० गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणेत येणार आहे. भीमा नदी स्वच्छ ठेवा असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
पंचायत समिती मोहोळ च्या वतीने घाटुळे मंगल कार्यालय येथे ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जलजीवन मिशन अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांचे कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन सिईओ स्वामी बोलत होते.या कार्यशाळेस उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी,बांधकामचे उप अभियंता दळवी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, चंद्रभागेचे पावित्र्य टिकविणे साठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणेत येत आहे. भीमा, निरा, सिना व माण या चार प्रमुख नदी काठची गावे आराखड्यात घेणेत आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायती साठी सार्वजनिक शौचालय देखील देणेत येणार आहे. या साठी १५ वा वित्त आयोगाचे निधीतून तरतुद करा. सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन साठी ७० टक्के निधी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून देणेत येत आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
चंद्रभागा नंदीचे पावित्र्य राखा. जनावरे धुवू नका. कपडे भांडी, वाहने धुवू नका. जुनी कपडे प्लास्टीक, कचरा टाकू नका. नदी साठी उघड्यावर शौच विघी करू नका असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.जगाचे कोपरे तून भाविक येतात. चंद्रभागेचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घेतात.जुने घाटाचे पुनर्जिवन करा. वृक्षारोपन करा. नदीच्या पात्राची धुर थांबवा. परिसरांत प्लास्टीक संकलन करा. नदीत साडपाणी जाणार नाही या दृष्टीने आराखडे तयार करा असे आवाहन केले. सिईओ स्वामी यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करा. ज्या कुटुंबाना अद्याप शौचालयाचा लाभ देणेत आला नाही त्या कुटूंबाकडे शौचालय होणे साठी कुटूंबाची नावे द्या. लोकसंख्येनुसार गावाचा कृती आराखडा तयार करा.सेफ्टीक टॅंक मधून बाहेर पडणारे पाण्यासाठी शौषखड्डा घेणे आवश्यक आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितलें. सामुहिक खत खड्डे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक यांचे सुक्ष्म नियोजन करा अशा सुचना देऊन या सर्व बाबी ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान अंतर्गत घ्या. अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन केले.