जितेंद्र आव्हाड यांच्या वर आणखी "ही" कलमं वाडवा - केतकी चितळे

0
जितेंद्र आव्हाड यांच्या वर आणखी "ही" कलमं वाडवा - केतकी चितळे

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक  केल्यानंतर आता या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेने  उडी घेतली आहे.

केतकीच्या वतीने वर्तक नगर पोलीस ठाण्याला  एक नोटीस पाठवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड  यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पुरेशी नसून अजून कलमे त्यात वाढवण्यात यावीत अशी मागणी, केतकी चितळे हिने आपल्या नोटीसमधून केली आहे.

ठाण्यातील मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या गोंधळा प्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड  यांना आज (शुक्रवारी) ताब्यात घेत अटक केली. त्यांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या या कारवाईवर संताप व्यक्त केला. त्यातच आता केतकी चितळे हिने देखील उडी घेतली आहे.

हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान मराहण झालेल्या तरुणाच्या पत्नीला देखील मारहाण झाल्याने कलम 354 लावावे आणि प्लॅनिंग करुन सर्व केल्याने कलम 120 ब लावावे, अशी मागणी केतकीने केली आहे. वर्तक नगर पोलिसांनी कलमे वाढवली नाहीत तर केतकी हायकोर्टात  जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.


जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल झाला.
मात्र त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील अशी आहेत.
परंतु या कलमांमध्ये विनयभंगाचे कलम लावण्यात आलेलं नाही.
चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्य़कर्त्यांनी गैरवर्तन केले.
त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचं  कलम लावावे. शिवाय हा हल्ला कट रचून केला आहे.
मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचं कलम लावलं नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कलमात वाढ करण्यात यावी अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !