सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना अकलूज येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने गेट बंद आंदोलन

0
सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना अकलूज येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने गेट बंद आंदोलन

प्रतिनिधी : 

आज सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना अकलूज येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने गेट बंद आंदोलन करण्यात आले ऊसाला पहिली उचल 2500 रूपये व फायनल 3100 रूपये मिळाले पाहिजे कारण सहकार महर्षीचा चालू गळीत हंगाम 61 असून एकदम जुना कारखाना असून सुध्दा दर देऊ शकत नाही एका बाजूला सदगुरू साखर कारखाना हा नवा असून
 त्या कारखान्याचा 11 वा सिझन असताना वाहतूक 80 ते 90 किलोमीटर असून उत्पादन खर्च जास्त असताना सदगुरु कारखान्याने पहिली उचल 2500, रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या चेअरमन यांनी दर जाहीर करावा अन्यथा आंदोलन अटळ आहे.
 यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे दिपक भोसले, समाधान फाटे,माऊली जवळेकर, शिवराम गायकवाड, शिराज तांबोळे, सतीश कुल्लाळ,विष्णू गोरड,किरण साठे,किरण भांगे अनेक कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते...
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !