विद्यार्थ्यांना नोकरी देणारा केंद्रबिंदू पंढरपूर सिंहगड
○६ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग: डाॅ. समीर कटेकर यांची माहिती
पंढरपूर: प्रतिनिधी
"सँकी सोल्युशन्स" हि कंपनी जगातील तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी डिझाईन, अनुप्रयोग विकास, डेटा सेवा, ऑटोमेशन, टेक असेसमेटं आदी क्षेत्रात कार्यरत असलेली "सँकी सोल्युशन्स" कंपनी शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये "सँकी सोल्युशन्स" कंपनीकडून कॅम्पस मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील एन. बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सोलापूर, एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर, स्वेरी इंजिनिअरींग काॅलेज, फॅबटेक इंजिनिअरींग काॅलेज, डब्ल्यू. आय. टी. काॅलेज सोलापूर, कर्मयोगी इंजिनिअरींग काॅलेज आदी ६ इंजिनिअरींग काॅलेज मधील ४०८ विद्यार्थी "सँकी सोल्युशन्स" कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये सहभाग घेतला होता.
"सँकी सोल्युशन्स" कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा, वैयक्तिक कौशल्य ज्ञान, परीक्षेतील गुण आदीसह अनेक बाबींचा मुलाखतीमध्ये समावेश होता. यामधुन देविका जैन, सोनम अंकुशराव, सागर थोरात, प्रियांका कांबळे, नेहा पडवळकर, फर्जिन शेख, स्वप्नील उबाळे, विठ्ठल शिरसाळे आदी ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून ४ लाख वार्षिक पगार मिळणार आहे.
हि निवड प्रक्रिया "सँकी सोल्युशन्स" कंपनीचे एच. आर. रवी उदय यांच्या उपस्थितीत पार पडली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे फक्त महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत नसुन जिल्हातील सर्वच अभियांत्रिकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थी व पालकांमधुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"सँकी सोल्युशन्स" कंपनीचा ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. वैभव गोडसे, राजाराम राऊत आदींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आयोजित कॅम्पस ड्राईव्ह दरम्यान "सँकी सोल्युशन्स" कंपनीचे पदाधिकारी, डाॅ. कटेकर व विद्यार्थी