बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने टेभुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना झाली आहे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनाही एकजुटीन आपलं प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी व्यक्त केले...
शेतक-यांचे शोषण करण्यासाठी सर्व कारखाना जसे एका फोन मध्ये एकत्र होतात तसेच शेतकरीही आपल्या न्याय हक्कासाठी, घामाचे दाम मिळवण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, शेतकरी उत्पादक खर्चाच्या तुलनेत पिकाला दर मिळत नाही असं विचार बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर यांनी व्यक्त केले...
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे,जिल्हाउपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरा, सातारा जिल्हा उपाध्यक्ष उत्तम खबाले जिल्हाउपप्रमुख रमेश भोसले,
जिल्हा युवाअध्यक्ष राजेंद्र डोके, जिल्हासंघटक बाबुराव डोके,
माढा तालुकाध्यक्ष पंडित पाटील,
मंगळवेढा तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपे, करमाळातालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, पंढरपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर झांबरे, मोहोळ तालुकाध्यक्ष शंकर भोसले, कामगार जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोंढे, सोलापूर जिल्हासंपर्क तानाजी पाटील, माढातालुका संपर्कप्रमुख दत्ता ननवरे, माढातालुका युवाध्यक्ष विकास पाटील,तसेच महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ.जयश्रीताई बोरा तसेच नूतन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली शेतकरी उपस्थितीत होते..
"बळीराजा शेतकरी संघटना"नावाचं गैरवापर करून काही महाभाग सोलापूर-उसमानबाद जिल्हात खंडणी वसुली उद्योग करीत आहेत त्याच्यापासून लोकांना सावध राहवे...
मा.पंजाबराव पाटील
संस्थापक अध्यक्ष
बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र