आज शनिवारी रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरसह उत्तराखंडच्या पौरी, टिहरी, बागेश्वर, पिथौरागढमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आली आहे. वृत्तानुसार, राजधानी आणि आसपासच्या गाझियाबाद, नोएडा या भागात सुमारे 54 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लगेचच लोक घराबाहेर पडले. त्याचबरोबर हाई राइज सोसायटीमध्ये राहणारे अनेक लोकही त्यांच्या सोसायटीतून बाहेर पडले.
भूकंप झाल्यास काय करावे आणि काय करू नये
भूकंप झाला की अनेकदा आपण घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण हे लगेच शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भूकंपानंतर तुम्ही घरी असाल तर जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करा. जवळपास एखादे टेबल किंवा फर्निचर असल्यास त्याखाली बसून आपले डोके हाताने झाकून घ्यावे.
या दरम्यान घरातच राहा आणि बाहेर पडू नका. सर्व विद्युत स्वीच बंद करावेत. तुम्ही घराबाहेर असाल तर उंच इमारती आणि विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर टाळा.
दिल्लीत आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंप
याआधी बुधवारी मध्यरात्री दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अशाप्रकारे आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआरची धरती हादरली आहे. बुधवारी दुपारी 1.57 च्या सुमारास यूपी आणि दिल्ली आणि एनसीआरच्या काही शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली, ज्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किमी खाली होता. त्याचवेळी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे कच्चा घरांचेही नुकसान झाले, त्यामुळे काही लोकांचा मृत्यू झाला.