सोलापूर मध्ये भीषण अग्नितांडव ;
नीलमनगरातील थोबडे चौकातील मुनोत टेक्स्टाईल आहे. या कारखान्यात रॅपिअर लूम्सवर टॉवेल्सचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास येथे अचानक आग लागली. आग लागताच गोंधळ उडून कर्मचार्यांची पळापळ सुरू झाली. आग वाढत असल्याने अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले.
दरम्यान, या आगीने रौद्र रुप धारण केले. शेजारील गोडावून तसेच रेडीमेडच्या दोन कारखान्यांनामध्ये ही आग लागली. सातच्या दरम्यान अग्निशमन दलाचे पाच बंब मागवण्यात आले. जवानांचे युद्धपातळीवर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे हे स्वत: घटनास्थळी हजर होते. आग लागलेला पहिला कारखाना हा मुनोत तर रेडीमेडचे कारखाने व गोडावून अनिल बोडा व मेरगू यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबतचा तपास सुरू आहे.