सहकार शिरोमणीच्या सभासदास 50 किलो साखर वाटप सुरु.

0
सहकार शिरोमणीच्या सभासदास 50 किलो साखर वाटप सुरु...

पंढरपुर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ

पंढरपूर - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.कल्याणराव काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सभासद साखर वाटप दुकानाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले....
  यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,डेप्युटी जनरल मँनेजर कैलास कदम,प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्यवस्थापक शिवाजीराव आगलावे, प्रशासन आधिकारी डि.एम.कुंभार, स्विय्य  सहाय्यक नितिन देवकर,सभासद व कर्मचारी उपस्थित होते. 
     सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद , बिगर सभासद , ऊस पुरवठादार शेतकरी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी 50 किलो साखर वाटप दि.14 नोव्हेंबर 2022 पासुन 31 डिसेंबर 2022 पर्यंत पंढरपूर व कारखाना साईट वरून विक्री केंद्रातून सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत सुरु करण्यात आले असून साखरेचे कुपन स्लिपबॉय मार्फत घरपोहोच करण्यात आले असल्याची माहिती व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी दिली..
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !