पंढरपूर सिंहगडच्या ३२ विद्यार्थ्यांची "कॅपजेमिनी" कंपनीत निवड

0
पंढरपूर सिंहगडच्या ३२ विद्यार्थ्यांची "कॅपजेमिनी" कंपनीत निवड

 पंढरपूर : प्रतिनिधी

       कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ३२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कॅपजेमिनी कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 
               ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. अनेक क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढतो त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मुलाखती मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील सरीष मोरे, साहील शेख, स्नेहल कारंडे, ऋतुजा मोरे, विनोद सोनलकर, विक्रम शिंदे, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील शोएब मुलाणी, आरती शेळके, अमृता माळी, श्रीकृष्ण चव्हाण, शिवानी गोसावी, प्रज्ञा राऊत, भाग्यश्री नागणे, वर्षा ठोकळे, शितल ढावरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील काजल मगर, सागर जाधव, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील स्नेहल भाकरे, सुमित नवले, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अविनाश मस्के, अक्षय बोगंणे, मोईन तांबोळी, शरद टोणे, सुरज पाटील, पुनम माने, गणेश चोपडे, मयुर कुलकर्णी, स्वप्नील जगताप, शुभम गाडेकर, विशाल काटे, रोहित देशमुख, अक्षयकुमार साळुंखे आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली असुन कॅपजेमिनी कंपनी कडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज चार लाख रूपये मिळणार आहे. 
    अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजने उत्कृष्ट निकाल व उत्कृष्ट प्लेसमेंट देऊन गुणवत्ता सिद्ध केली असून महाविद्यालयाला नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला असुन उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त करणारे पंढरपुर सिंहगड हे पहिले इंजिनिअरींग काॅलेज ठरले आहे. विद्यार्थ्यांना पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधुन नामांकित कंपनीत नोकऱ्या भेटत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
   कॅपजेमिनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !