घर बसल्या तुमचे आधार कार्ड बनवा एटीएम कार्ड प्रमाणे, पीवीसी आधार कार्डसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज
प्रतिनिधी : आपण या भारताचे नागरिक आहोत याची खरी ओळख आपल्याला आधार कार्ड मार्फत पटते. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असने आवश्यक आहे. आजवर आपल्याला आधार कार्ड एका कागदावर छापून मिळत होते.
मात्र आता ते पीवीसी स्वरूपात उपलब्ध आहे. पीवीसी आधारकार्ड वापरायला सहज सोपो आहे. आज या बातमीमधून पीवीसी आधारकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेऊ.
या साठी सर्वात आधी तुम्हाला यूआयडीआयच्या uidai.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. इथे रजिस्ट्रेशन केल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल. यावर आधी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर वर्चुअल आयडी क्रमांक आणि रजिस्ट्रेशन क्रमांक टाकावा. यात तुमचा जो मोबाइल नंबर आधारला लिंक आहे तो टाकावा. त्यावर आलेल्या ओटीपीवर पुढील सुचना निट फॉलो कराव्यात.
मोबाईल क्रमांक लिंक नसेल तरी देखील तुम्हाला पीवीसी आधार कार्ड मिळू शकते. यासाठी एक वाढीव स्टेप फॉलो करावी लागेल. यात आधी http://residentpvc.udai.gov.in/ order-pvcreprint या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर करा. पुढे तुम्हाला सिक्यूरीटी कोड विचारला जाइल. तसेच माय मोबाइल नंबर नॉट रजिस्टर असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा. तिथे तुमचा मोबाइल नंबर टाकून सेंड ओटीपीवर क्लीक करा.
ओटीपी आल्यावर तो टाका. पुढे तुम्हाला यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. ते शुल्क भरल्यावर तुम्हाला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक मॅसेज येईल. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये तुमच्या पत्त्यावर तुमचे आधारकार्ड पोहचवले जाईल. ही प्रक्रिया आतीशय साधी आहे. त्यामुळे आजच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी लागणारा वेळ देखील कमी आहे. आधार कार्ड आज प्रत्येक कामात वापरले जाते. त्यामुळे पीवीसी आधार कार्डचा यात तुम्हाला खुप फायदा होईल.