आज ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने गांधीगिरी आंदोलनाला सुरुवात केली
पंढरपूर :प्रतिनिधी
आज ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने गांधीगिरी आंदोलनाला सुरुवात केली आज ट्रॅक्टर ड्रायव्हर व ट्रॅक्टर मालक यांचा हार घालून त्यांच्या पाया पडून आंदोलनाला सुरुवात केली पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे सुरू असलेल्या ऊस तोडणीच्या फडा मध्ये जाऊन कोयता बंद आंदोलन करून ऊस तोडी बंद पडल्या
ऊसाला पहिली उचल 2500 रुपये व फायनल बिल एकतीसशे रुपये मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक करू नका अशी आज विनंती केली उद्यापासून जर रोडवर ट्रॅक्टरचे चाक दिसलं तर संघर्ष समितीच्या वतीने खळखट्याक आंदोलनाला सुरुवात होणार आहे यावेळी माऊली हळणवर,दीपक भोसले ,समाधान फाटे ,तानाजी बागल , विश्रांती भुसणर ,सचिन पाटील ,माऊली जवळेकर ,रणजीत बागल ,सचिन आटकळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते