पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची "एक्युम टेक्नॉलॉजीज" कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली. एक्युम टेक्नॉलॉजीज कंपनी द्वारे नवकल्पना आणि ऑटोमेशन संपुर्ण उद्योगांमध्ये (बीएफएसआय, उत्पादन, शिक्षण, तंत्रज्ञान, सरकार) सेवा देते. एक्युम टेक्नॉलॉजीज कंपनी मॅनेजमेंट, सिक्युरिटीज आणि एक्स्चेंजला सुद्धा सेवा प्रदान करते.
देशातील सर्व प्रमुख एक्सचेंजेससह काम करत असून देशातील १० टाॅप पैकी सात बँकांसह आणि सर्व प्रमुख विमा कंपन्यांसोबत एक्युम टेक्नॉलॉजीज कंपनी काम करते. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील आकाश भारत पिसे, निकीता तात्यासो गावंधरे, प्रियंका महेश भिवरे, ऐश्वर्या बाळू कांबळे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील राम नवनाथ नागणे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील प्रथमेश पांडूरंग वगरे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील अजय सुभाष शिंगाडे आदी ७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून ३ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"एक्युम टेक्नॉलॉजीज" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.