उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे ऊस दर संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी : सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करा म्हणून गेल्या पाच दिवसापासून ऊस दर संघर्ष समिती कार्यालयात हेलपाटे मारत होते परंतु कारखानदारांना मॅनेज असणाऱ्या आरटीओ अधिकारी हेतू पुरस्कृत कार्यवाही करत नाहीत
म्हणून आज सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या केबिनमध्ये कोडुन घेत ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर वर कारवाई होत नाही तोपर्यंत या केबिन मधून उठणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात दिपक भोसले, माऊली हळणवर, समाधान फाटे , तानाजी बागल, अजित बोरकर, शिवाजी पाटील आजिनाथ परबत माऊली जवळेकर शहाजान शेख रंजीत बागल बाळासाहेब जगदाळे विश्रांती भुसणर शिवराम गायकवाड सत्यवान गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहे