धक्कादायक शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर झाडली गोळी.भाजप मध्ये शोककळा.

0

धक्कादायक !शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वर झाडली गोळी भाजप मध्ये शोककळा


बीड : 
महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तातडीने पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून मिळत आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !