सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील पालक मेळाव्यात उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी गोरख तुळशीराम फुले, काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी आदी च्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने पालक मेळाव्याची सुरवात करण्यात आली. यादरम्यान उपस्थित पालकामधुन पालक प्रतिनिधी गोरख तुळशीराम फुले यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या पालक मेळाव्यात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा पीपीटी द्वारे उपस्थित पालकांसमोर सादर केला. यादरम्यान उपस्थित पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे उपस्थित पालकांना संबोधित करताना म्हणाले, महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक असते. या कार्यक्रमातून आयोजित केलेल्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ह्या मेळाव्याचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. ऋषिकेश कुलकर्णी यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.