श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस ₹३.६० लाख किमतीची कॅनन कंपनीचा कॅमेरा देणगी
पंढरपूर, दि. २८ सप्टेंबर २०२६ :
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांना मंदिरातील धार्मिक विधी, उत्सव तसेच दैनंदिन छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणासाठी *कॅनन (Canon) कंपनीचा सुमारे ₹३ लाख ६० हजार किमतीचा* कॅमेरा देणगी स्वरूपात प्राप्त झाला.
ही देणगी श्री. राहुल गवारी, श्री. राजू गवारी, श्री. अविनाश गवारी व श्री. गणेश कर्पे, गणेश फळके मु.पो. मोई जि.पुणे यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्द केली.
मंदिर समितीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे, दैनंदिन धार्मिक विधींचे तसेच महत्त्वाच्या प्रसंगांचे दर्जेदार छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी सदर कॅमेराचा उपयोग होणार आहे. देणगीदारांनी मंदिर समितीस दिलेल्या या सहकार्याबद्दल मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रविणकुमार घम यांनी देणगीदारांचा यथोचित सत्कार करून त्यांचे आभार मानले. या प्रसंगी देगावचे सरपंच श्री. संजय घाडगे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विविध धार्मिक, सामाजिक व भाविकसेवा उपक्रमांसाठी भाविक व दानशूर व्यक्तींकडून मिळणारे सहकार्य मंदिर समितीसाठी महत्त्वपूर्ण असून, अशा सहकार्यामुळे मंदिरातील सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होत आहे.

