आजऱ्यात स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांना निवडून देण्याचा निर्धार

Maharastra now 24
0

आजऱ्यात स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांना निवडून देण्याचा निर्धार

 ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांनी साधला शिक्षकांबरोबर संवाद

सातारा– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया महिन्यावर येऊन ठेपली असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षणातील विविध यशस्वी उपक्रमामुळे राज्यात ज्ञानयात्री म्हणून ओळख झालेले स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शिक्षकांशी थेट संवाद साधला. त्यावेळी तालुक्यातील शिक्षकांनी सरांना आमदार म्हणून पाहण्याचे ठरविले आहे, असे लक्षात येत आहे कारण डॉ.रोंगे सरांच्या भेटीला जत्रेचे स्वरूप लाभत आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या करिअर प्रमाणे या तालुक्यात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे देखील भविष्य उज्वल झाले पाहिजे या भावनेतून शिक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. 

      निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी डॉ. रोंगे सरांसोबत शिक्षकांच्या गर्दीत भर पडत आहे. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी अर्थात श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे सर हे गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महीन्यापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन परिसर पिंजून काढत आहेत आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या निमित्ताने आजरा तालुक्यात सर्वत्र डॉ. रोंगे सरांचे स्वागत केले जात आहे. या अनुषंगाने प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीच्या रूपाने प्रचारात आघाडी घेतली आहे हे स्पष्ट होते. स्वेरीच्या स्थापनेपासून डॉ. बी.पी.रोंगे सरांची मुद्देसूद आणि व्यवस्थित मांडणी, प्रत्येक समस्येचा सुक्ष्म अभ्यास या धोरणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या तंत्रशुद्ध अभ्यासाचा आता राज्याला फायदा होणार आहे. डॉ. रोंगे सरांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद लाभत आहे. मतदार नोंदणीपासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रियाबाबत डॉ. रोंगे सर प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भेट घेवून चर्चा करत आहेत. सरांच्या या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. रोंगे सरांना पाठिंबा दर्शविला आहे. या भेटीमध्ये सर्व शाळांमध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी डॉ. रोंगे सरांचे कमालीचे स्वागत करत आहेत. मागील उमेदवारांच्या कामगिरीपेक्षा डॉ.रोंगे यांचेकडून शिक्षकांना अभ्यासपूर्ण कार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डॉ. रोंगे सरांच्या या प्रक्रियेतील सहभागामुळे शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. एकूणच डॉ.रोंगे सर यांच्या स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या तिन्ही संस्थांना अल्पावधित मिळालेल्या यशामुळे शिक्षकांची अपेक्षा वाढली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील जवळपास ३० शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, आजरा महाविद्यालय आजरा, आजरा हायस्कूल आजरा, व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा, डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आजरा, व्यंकटराव कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालय आजरा यासह इतर शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. वास्तविक पाहता आमदार होण्यापूर्वीच डॉ. रोंगे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा सेवा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. बब्रुवाहन रोंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नियुक्ती व सेवा विषयक एकूण ३७ प्रकरणे सोडवली गेली आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने कार्यवाही करत एकाच दिवसात ३७ प्रकरणांची सोडवणूक करून न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या कारणांमुळे डॉ. रोंगे सरांच्या भेटींचे सर्वत्र स्वागत होत आहे. या भेटी दरम्यान बोलताना डॉ.बी.पी. रोंगे सर म्हणाले की ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी व समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही डॉ. रोंगे सरांनी दिली. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी काही प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे डॉ. रोंगे सरांकडे आजरा तालुक्यातील शिक्षक आशेने पाहत आहेत, हे मात्र नक्की जाणवते.

Tags
  • Newer

    आजऱ्यात स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांना निवडून देण्याचा निर्धार

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)