पंढरपूर सिंहगडच्या ६ विद्यार्थ्यांची रिलायन्स जिओ कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून रिलायन्स जिओ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लिमिटेड ही एलटीई सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने बिनतारी संदेशवहन करणारी कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रिजच्या पुर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. या कंपनीकडे २ जी व ३ जी प्रकारचे नेटवर्क जाळे नसून ही कंपनी पुर्ण ४ जी आणि ५ जी नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक मुकेश अंबानी हे आहेत. अशा या कंपनीत एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील साक्षी राहूल उपलाप, ऐश्वर्या शुभम लिमकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील निवेदिता शंतनू बागल, शुभम दत्तात्रय मंगळवेढेकर, नागेश बाळासाहेब गिरीगोसावी आदी ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली असुन कंपनीकडून ४ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. सिंहगड कॉलेज मधील प्लेसमेंटचे वर्चस्व वाढत असल्याने विद्यार्थी व पालकांमधुन आनंद व्यक्त होत आहे.
रिलायन्स जिओ कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.