ऊस उत्पादक शेतकर्यांनी दामाजी कारखान्याला गळीतासाठी आपला ऊस घालून सहकार्य करावे

0
ऊस उत्पादक शेतकर्यांनी दामाजी कारखान्याला गळीतासाठी आपला ऊस घालून सहकार्य करावे - शिवानंद पाटील,चेअरमन

मंगळवेढा (प्रतिनिधी):-नागेश काळे

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन २०२२-२३ गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पुजन मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन श्री। राहूल शहा, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख श्री। रामकृष्ण नागणे, कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन श्री।तानाजी खरात यांचे शुभहस्ते शनिवार दि।२९/१०/२०२२ रोजी करण्यात आले असलेची माहिती कार्यकारी संचालक श्री।सुनिल दळवी यांनी दिली।
कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दि।१७/१०/२०२२ रोजी झाला होता। परंतु हंगामाचे सुरुवातीला मोठया प्रमाणात पाऊस झालेने प्रत्यक्ष गाळपास दि।२७/१०/२०२२ रोजी सुरुवात केलेली असुन चालु हंगामाकरिता कार्यक्षेत्रामध्ये ८ ते ९ लाख मे।टन ऊस उपलब्ध आहे। कमी कालावधीत अनेक अडचणीवर मात करत गळीत हंगाम सुरु केला आहे। आपला कारखानाही जिल्हयातील इतर कारखान्याच्या बरोबरीने वेळेत सुरु झालेला आहे। या हंगामात सहा लाख मे।टन गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने  ठेवलेले आहे। सर्व सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, कामगार यांच्या सहकार्याने हे उद्धिष्ट आपण निश्चीतच गाठणार आहोत। याकरिता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी- सभासद यांनी आपला ऊस दामाजी साखर कारखान्याचे गळीतास पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन श्री।शिवानंद पाटील यांनी साखर पोते पुजन प्रसंगी केले.
साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच चंद्रशेखर कोंडूभैरी, पिंटू शिंदे, धनाजी बिचुकले, सुरेश पाटील, प्रमोद पुजारी, शुभम पुजारी, सिध्दे्श्वर डोके, राजू रणे, गेना दोलतडे, तसेच विभाग प्रमुख,परिसरातील सभासद-शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, सिझन कामाचे काùन्टùक्टर व  कर्मचारी उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !