ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने आज विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट नंबर 2 करकंब येथे गेट बंद आंदोलन
करकंब प्रतिनिधी : ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने आज विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट नंबर 2 करकंब येथे गेट बंद आंदोलन करण्यात आले उसाची पहिली उचल 2500 रुपये व फायनल 3100 रूपये दिले पाहिजे.
सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार जाणीवपूर्वक ऊस दराची कोंडी फोडत नाहीत ऊस वाहतूक करणारे वाहन मालकाने शेतकरी संघटना यांचा संघर्ष घरी बसून कारखान्याचे चेअरमन बघत आहेत परंतु आपल्याला काही देणं घेणं नसल्यासारखं उसाला दर जाहीर करण्यासाठी कोणी पुढे येत नाही त्याच्या निषेधार्थ गेट बंद आंदोलन करण्यात आले. सोमवारच्या मीटिंगसाठी ऊस दराचा तोडगा काढायचा असेल तर यातील सर्व कारखान्याचे चेअरमन आणि एमडी उपस्थित राहिले पाहिजे जर ऊस दर संघर्ष समितीच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांमधला भगतसिंग जागा झाल्याशिवाय राहणार नाही आज शेतकऱ्याचा पोरगा जिवावर उदार होऊन आंदोलनात सहभागी होत आहे कारण त्याच्या बापाचं गणित बिघडलं आहे ... जर ऊस दराचा प्रश्न उद्या सुटला नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये तांडव घडल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने व सर्व कारखानदाराने लवकरात लवकर घ्यावी.
यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते, दिपक भोसले, सचिन पाटिल, तानाजी बागल, समाधान फाटे, माऊली हळणवर, माऊली जवळेकर, अतुल खुपसे, नंदू व्यवहारे, राहूल बिडवे, राय्याप्पा हळणवर, निवा नागणे