श्री विठठलचे सभासद असल्याने साखर पोती पुजनास आमची उपस्थिती.
काळे यांचे सोबतच संचालकांचा पत्रकार परिषदेत खुलासा..
पंढरपूर प्रतिनिधी दि.29- श्री विठठल सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 -23 च्या गळीत हंगामातील पहिल्या 11 साखर पोत्यांच्या पुजन प्रसंगी आम्हाला चंद्रभागेचे संचालक म्हणून निमंत्रण नव्हते तर आम्ही विठठलचे सभासद आहोत म्हणून निमंत्रण दिले होते. *विठठल आणी चंद्रभागा विठठल परिवारातीलच संस्था आहेत. यामुळे दोन्हीही संस्था आपल्या आहेत या भावनेतून आम्ही पहात असून आम्ही कायमस्वरुपी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सोबतच कायम असणार आहोत असा खुलासा सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, बाळासाहेब कौलगे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.*
मागील चार दिवसापुर्वी विठठल सहकारी साखर कारखान्याच्या साखर पोती पुजन प्रसंगी सहकार शिरोमणीचे अनेक संचालक उपस्थित होते त्यामुळे समाजमाध्यमामध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या परंतू या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसून श्री विठठल परिवार एकसंघ राहावा ही आमची भावना आहे असे सांगून विठठल साखर कारखान्याचे पदाधिकारीही सहकार शिरोमणीच्या बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा व मोळी पुजन, साखर पोती पुजन कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे परिवारातील संस्थांच्या कार्यक्रमास जाणे येणे होत राहते त्यामुळे या उलट सुलट चर्चांना काहीही अर्थ नसल्याचे संचालकांनी सांगीतले.
आगामी सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणुकीमध्ये विठठलचे चेअरमन अभिजीत पाटील हे विठठल परिवारातीलच आहेत. त्यांची आणी आमची गेली अनेक वर्षापासूनची जवळीकता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला विठठलचे सभासद या नात्याने साखर पोती पुजन प्रसंगी बोलविले होते त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा खुलासाही यावेळी संचालक बाळासाहेब कौलगे, दिनकर कदम यांनी केला यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक जेष्ठ सभासद रामभाऊ कौलगे उपस्थित होते.