मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा ; जुहू चौपाटी वर पोलिसांचा बंदोबस्त

0
 मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा ; जुहू चौपाटी वर पोलिसांचा बंदोबस्त

31 ऑक्टोबरला पहाटे समुद्राला भरती येणार असल्याने जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे  पाटील यांनी सांगितले.

मुंबई मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा साजरी केली जाणार आहे. जुहू चौपाटीसारख्या ठिकाणी गर्दी असेल त्यामुळे त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला पहाटे समुद्राला भरती येणार असल्याने जीवरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे  पाटील यांनी सांगितले.

छटपूजेदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबईत छठ महापर्व मोठ्या थाटामाटात साजरे केले जाणार आहे. सर्वात मोठी गर्दी जुहू बीचवर आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून लोक येथे येतात. या ठिकाणी बिहारी आघाडीतर्फे भक्तीगीते सादर केली जाणार आहेत. काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे बिहारी आघाडीचे अध्यक्ष आहेत. संजय निरुपम आणि सहआयुक्त मुंबई कायदा व सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील बीचवर पोहोचले होते. येथील कामाचा व संभाव्य गर्दीचा आढावा घेतला. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता येथे छठ पूजा होणार आहे. मावळतीला आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता केली जाते. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी महिला पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबईत 81 ठिकाणी छठ पूजा

 बिहारी आघाडीचे अध्यक्ष संजय निरूपम म्हणाले, की लाखो लोक येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. सहआयुक्तांनी पाहणी केली आहे. पूजा चांगली व्हावी, ही प्रार्थना आहे. छठ गीतेसाठी गायक चंदन तिवारी येणार आहे. तसेच अभिनेता पंकज त्रिपाठी येणार आहेत. महाराष्ट्रात येणारे रोजगार हे गुजरातमध्ये जात आहेत. टाटा एअरबसची नागपूरहून थेट गुजरातमध्ये लँडिंग झाली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे छट पूजेत येणार आहेत का हे माहित नाही. पण त्यांनी पूजेत यावे. मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले, की गर्दी नियंत्रणाचे व्यस्थापन केले आहे. त्यामुळे कोणतीही समस्या येणार नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !