सिंहगड मध्ये गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म संबंधित व्याख्यान संपन्न

Maharastra now 24
0
सिंहगड मध्ये गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म संबंधित व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधि

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार  दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी  *गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म* या विषयासंबंधी विश्लेषणात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानात विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी प्रास्ताविक करताना सध्याच्या काळाची गरज म्हणून क्लाऊड तंत्रज्ञाना संबंधित माहिती दिली. नामांकित आय टी कंपनीमध्ये डेटा इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे मंगेश यादव यांनी विद्यार्थ्यांना गुगल क्लाऊड संबंधित 
मार्गदर्शन दिले. तसेच त्यांनी या तंत्राचा वापर करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ .के .जे. करांडे बोलताना म्हणाले की,शैक्षणिक सत्रामध्ये सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी आणि भविष्यात कंपनीच्या गरजा ओळखून कायम अद्ययावत राहण्यासाठी विविध कल्पकतेला वाव देणाऱ्या वेबिनार व कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयामधे नेहमीच केले जाते. 
  या व्याख्याना मध्ये ६४ विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.  उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना मंगेश यादव यांनी समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली .या व्याख्यानाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनीधी रोहन चौगुले यांनी मानले.
Tags

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)