यशवंत पवार यांचा सोलापूरात सत्कार
सत्कारासाठी पत्रकारांची गर्दी
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांना ठाणे येथील दैनिक साम्राज्य चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार नुकताच देण्यात आला ठाणे येथील हॉटेल रॉयल इन येथील सभागृहात मध्ये अनेक मराठी चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन यशवंत पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांची हजेरी होती
यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांसाठी
*जेष्ठ पत्रकार पेन्शन योजना*
*पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना*
*राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घेणे व मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव मदत मिळावी* म्हणून सातत्याने प्रयत्न केल्याने यशवंत पवार यांच्या अमूल्य कार्याची दखल घेऊन ठाणे येथील दैनिक साम्राज्य चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला होता याच अनुषंगाने पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे यशवंत पवार यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
*हा सन्मान संघर्षाचा*
यावेळी बोलताना यशवंत पवार म्हणाले की मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे हा माझ्या संघर्षाचा सन्मान असून आपण राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे काम करून पत्रकारांचे प्रश्न सोडवू
या सत्कार प्रसंगी जिल्हा संघटक दत्तात्रय पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार महिला जिल्हा अध्यक्ष सुवर्णा सुना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस )प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद दैनिक अबतक चे मुख्य संपादक प्रसाद जगताप संपादक विष्णू सामल करण सुना युनूस तांबोळी साप्ताहिक यश संघर्ष चे उपसंपादक विजय चव्हाण रोहित घोडके सिद्राम येलदी हारून फुलमामडी सतीश गडकरी भालराज सामल ऍड दिलीप जगताप इलाई शहापुरे मनीषा गुरव मंगल शेळके आफरीन पटेल अ करीम कामले राजेश राऊळ इत्यादी पत्रकार मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती
