गणेश उत्सव निमित्त पंढरपूर ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च
प्रतिनिधी : पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेश उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत होण्याच्या दृष्टीने व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक रहावा व सर्वसामान्य लोकांना कायद्याबद्दल विश्वास व आदर निर्माण व्हावा म्हणून पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण हद्दीतील मौजे कोर्टी ता. पंढरपुर या गावी मा. पोलीस अधीक्षक मा. तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक मा. हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली काल रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, सहाय्यक फौजदार मुंडे, जगताप, कर्चे, मोटे व इतर पोलिस अमलदार सहभागी झाले होते.
रूट मार्च दरम्यान कोर्टी गावातून गावात हेल्मेट, गॅस गन, लाठी, शील्ड, शस्त्र, दारुगोळा इत्यादी साहित्यासह तसेच पोलीस वाहनासह रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च दरम्यान गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
