यूपीत 22 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

Maharastra now 24
0

यूपीत 22 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

 आयकर विभागाच्या(Income Tax) पथकांनी एकाच वेळी लखनऊ आणि कानपूरसह २२ ठिकाणांवर छापे मारले. 




 आयकर विभागाच्या निशाण्यावर उत्तर प्रदेशातील १२ भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी आहेत.

उत्तर प्रदेशातील १२ हून अधिक भ्रष्टाचारी आणि लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात आयकर विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी एकाचवेळी १२ ठिकाणांवर छापे मारले.

उत्तर प्रदेशातील अनेक विभागांमध्ये कार्यरत असलेले जवळपास १२ सरकारी अधिकारी (Government Officer) आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अनेक विभागांमधील कार्यालयांवर छापे मारण्यात आले आहेत. गुप्तता बाळगून आयकर विभागाने ही कारवाई केली आहे, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

ऑपरेशन बाबू साहब पार्ट २ या मोहिमेंतर्गत काही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला १८ जूनपासून दिल्लीतून सुरुवात झाली होती. आता ही कारवाई उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूरसह अनेक ठिकाणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. टेंडरपासून अनेक योजनांमध्ये या विभागांतील अधिकारी सामील आहेत. यासंदर्भात ठोस माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या पथकांनी धाडसत्र सुरू केले आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)